Xi Jinping : ब्राझीलमधील ब्रिक्स परिषदेला जिनपिंग जाणार नाहीत; PM मोदींना स्टेट डिनरच्या आमंत्रणाने चिनी राष्ट्रपती नाराज
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पुढील आठवड्यात ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. राष्ट्रपतींच्या व्यस्त वेळापत्रकाचा हवाला देत चीनने ब्राझीलला याची माहिती दिली आहे, असे वृत्त साउथ चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP) ने दिले आहे.