Sukma : सुकमामध्ये १६ नक्षलवादी ठार, दोन सैनिक जखमी
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शनिवारी सकाळी सुरक्षा कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत आतापर्यंत १६ नक्षलवादी ठार झाले आहेत. INSAS आणि SLR सह मोठ्याप्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. एका वर्षात आतापर्यंत ४१० नक्षलवादी मारले गेले आहेत.