Raju Shetti : राधाकृष्ण विखे पाटलांच्या वक्तव्यावर राजू शेट्टींचा हल्लाबोल; ऊस दर वाढवला असता तर तुमचे कर्जही आम्हीच फेडले असते!
गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्री आणि नेतेमंडळींकडून कर्जमाफीवरून शेतकऱ्यांवर बेताल वक्तव्ये करण्याची एक मालिकाच सुरू आहे. आता या यादीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भर पडली आहे. विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवर अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी ‘आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची, हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे,’ असे म्हणत मुक्ताफळे उधळली.