• Download App
    sugar factory | The Focus India

    sugar factory

    Karnataka : कर्नाटकात ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला हिंसक वळण; 100 हून अधिक ट्रॅक्टर जाळले; ऊसाला प्रति टन 3,500ची मागणी

    कर्नाटकातील बागलकोटमध्ये, ऊसाच्या किमती वाढवण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या निदर्शनांना हिंसक वळण लागले. रबकावी-बनहट्टी तालुक्यातील गोदावरी साखर कारखान्यात ऊसाने भरलेले १०० हून अधिक ट्रॅक्टर जाळण्यात आले.

    Read more

    Ajit Pawar : पुरुष असूनही काहींनी लाडक्या बहिणींचा लाभ घेतला; अजित पवार म्हणाले- जूनमध्ये कर्जमाफीचा निर्णय, पण एकदाच

    इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते झाला. शेतकऱ्यांच्या हस्ते गव्हाणीपूजन आणि मोळी टाकून गळीत हंगामाचे उद्घाटन करण्यात आले. पारंपरिक संगीत, शेतकऱ्यांचा उत्साह आणि कारखान्याच्या परिसरात उभा असलेला गजबजलेला माहोल यामुळे संपूर्ण परिसरात सणासारखे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी आणि कारखान्याच्या प्रगतीबाबत महत्त्वपूर्ण भाष्य करत राज्याच्या आर्थिक आणि कृषी धोरणांबाबत अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला.

    Read more

    Ajit Pawar : माळेगावात अजित पवारांचेच वर्चस्व; 21 पैकी 20 जागा जिंकल्या, शरद पवारांच्या पॅनलचा दारुण पराभव

    राज्यात लक्ष वेधून घेतलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलने मोठा विजय मिळवला आहे. या पॅनेलने 21 पैकी 20 जागांवर विजय मिळवत कारखान्यावर आपले वर्चस्व सिद्ध केले. दुसरीकडे, सहकार बचाव पॅनेलच्या वाट्याला केवळ एक जागा आली असून, शरद पवारांच्या बळीराजा पॅनेलला एकही जागा मिळाली नाही.

    Read more

    राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याकडूनच कल्याण काळे यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडीकडे तक्रार, शेअर्सच्या नावाखाली शेतकºयांकडून गोळा केले ३५ कोटी रुपये

    केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनाकारण गोवत असतानाच आरोप केला जात असताना आता राष्ट्रवादी कॉँग्रेसच्याच एका नेत्याने आपल्याच पक्षाच्या दुसऱ्या  नेत्याविरुध्द आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप […]

    Read more