Sudhanshu Trivedi : नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेत येण्यापूर्वीच नॅशनल हेराल्ड प्रकरण दाखल झाले होते – सुधांशू त्रिवेदी
नॅशनल हेराल्ड प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभा खासदार सोनिया गांधी आणि सॅम पित्रोदा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. भाजपचे राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, काँग्रेसने हे लक्षात ठेवावे की जेव्हा नरेंद्र मोदी सरकार केंद्रात सत्तेत आले नव्हते तेव्हा हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.