Supreme Court : आरक्षणासाठी जाट समाजातून बौद्ध बनले; हा नवीन फ्रॉड! सुप्रीम कोर्टाने हरियाणा सरकारकडे मागितले स्पष्टीकरण
हरियाणातील जाट समुदायाशी संबंधित नीट-पीजीच्या दोन उमेदवारांनी परीक्षेपूर्वी बौद्ध धर्म स्वीकारल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने बुधवारी प्रश्न उपस्थित केले. कोर्टाने म्हटले की, हे मेडिकलच्या पीजी कोर्समध्ये अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न दिसतो. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर निखिल पुनिया आणि एकता यांच्या रिट याचिकेवर सुनावणी सुरू होती. त्यांनी मेरठमधील एका मेडिकल कॉलेजमध्ये बौद्ध अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेश मागितला होता.