Yogi Govt : योगी सरकारचा शाळेत जाण्यासाठी वार्षिक 6 हजार भत्ता; शाळा 5 किमीपेक्षा जास्त अंतरावर असल्यास मिळेल लाभ
उत्तर प्रदेश सरकार आता दररोज शाळेत जाणाऱ्या मुलांना दरवर्षी ६ हजार रुपये भत्ता देणार आहे. ज्या मुलांना त्यांच्या घरापासून ५ किमीच्या परिसरात सरकारी शाळा नाही ते हा भत्ता मिळण्यास पात्र असतील. या योजनेच्या मदतीने, राज्य सरकार शाळांमध्ये मुलांची उपस्थिती वाढवण्याच्या ध्येयाकडे काम करेल.