PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली
सरकारने आता प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधी म्हणजेच पीएम स्वनिधी योजना २०३० पर्यंत वाढवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम स्वनिधी योजनेची पुनर्रचना करण्याचा म्हणजेच त्यात आणखी सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, कर्जाचा कालावधी ३१ डिसेंबर २०२४ वरून ३१ मार्च २०३० पर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे.