stray dog : भटक्या कुत्र्यांची काळजी माणसांच्या जीवापेक्षा महत्त्वाची? वर्षभरात ३७ लाखांहून अधिक जणांना चावे, तरी सरकारची कारवाई फक्त नियमापुरतीच
देशभरात भटक्या कुत्र्यांनी माजवलेली दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मागील वर्षभरात तब्बल ३७ लाख ४० हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावे घेतले, तर किमान ५४ जणांचा मृत्यू रेबीज किंवा गंभीर जखमांमुळे झाला. इतकी भीषण आकडेवारी समोर असूनही केंद्र सरकारने या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याऐवजी केवळ प्राणी जन्म नियंत्रण (ABC) नियम २०२३ यांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.