Sanjay Raut : संजय राऊतांचा आजारपणावर मोठा खुलासा; कॅन्सरचे झाले निदान, स्वत: मुलाखतीत दिली माहिती
गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा आणि तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर खुद्द संजय राऊत यांनीच या मौनाला पूर्णविराम दिला आहे. “मला पोटाचा कॅन्सर झाला होता,” असा धक्कादायक पण तितकाच धाडसी उलगडा त्यांनी एका मुलाखतीत केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या वैयक्तिक लढाईतून ते आता यशस्वीपणे बाहेर पडत असून, त्यांनी पुन्हा एकदा राजकीय मैदानात पूर्ण ताकदीने एन्ट्री केली आहे.