• Download App
    State Election Commission | The Focus India

    State Election Commission

    ZP Election : ZP निवडणुकीपूर्वी सरकारचा मोठा निर्णय; उमेदवारी अर्जावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय राहणार अंतिम

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, 1961 च्या कलम 14 (2) मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे जिल्हा परिषद, पंचायती समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जाशी संबंधित मुद्यांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहणार आहे. त्याचा मोठा लाभ सत्ताधाऱ्यांना मिळण्याचा दावा केला जात आहे.

    Read more

    Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांची आयोगावर टीका- मतदार यादीतील दुबार नावांवरून आक्रमक, हा पोरखेळ!

    राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानंतर मतदार यादीवरून राज्य निवडणूक आयोगावर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची मतदार यादी जशीच्या तशी स्वीकारणे हे निकोप लोकशाहीचे लक्षण नाही. मतदार यादीतील अडचणी आधी दुरुस्त करायला हव्या होत्या, मात्र दुबार नावे काढण्याबाबत आधी अधिकार असल्याचे सांगणारा आयोग आता अचानक अधिकार नसल्याचे म्हणत थोरात यांनी टीका केली आहे.

    Read more

    Election Commission : आयोगाने केले विरोधकांच्या शंकांचे निरसन, संभाव्य दुबार मतदारांसह कास्ट व्हॅलिडिटीवर काय म्हटले, वाचा सविस्तर

    राज्याच्या प्रलंबित महापालिका निवडणुकांचा विषय आज मार्गी निघाला. राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याची घोषणा केली. त्यानुसार, 15 जानेवारी 2026 रोजी मतदान, तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. या निवडणुकीसाठी आयोगाने उमेदवारी अर्ज ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आयोगावर होणाऱ्या चौफेर टीकेच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुबार मतदारांचा पायबंद करण्यासाठीही काही ठोस निर्णय घेतलेत.

    Read more

    Maharashtra Municipal Corporation : द फोकस एक्सप्लेनर: महानगरपालिका निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, 29 मनपा, 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल

    राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी निवडणूक होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेसह या महापालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

    Read more

    Raj Thackeray : वडिलांचे वय मुलापेक्षा कमी कसे? राज ठाकरे यांचा राज्य निवडणूक आयोगाला सवाल; मतदार याद्यांत प्रचंड घोळ असल्याचा आरोप

    राज्यातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनी मंगळवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. या भेटीवेळी विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेतील विविध गंभीर त्रुटींवर आवाज उठवला. यावेळी राज ठाकरे यांनी विशेषतः मतदार याद्यांमधील ‘घोळ’ आणि ‘मतदार नोंदणी’ थांबवल्याच्या मुद्द्यावर तीव्र आक्षेप घेत अनेक प्रश्न उपस्थित केले.

    Read more

    Maharashtra ZP : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग; जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षणाची 13 ऑक्टोबरला सोडत

    दिवाळीनंतर लगेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुराळा उडण्याची शक्यता आहे. राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या 336 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.

    Read more