Maharashtra government : महाराष्ट्र सरकारचे गृहनिर्माण धोरण जाहीर : विद्यार्थी, ज्येष्ठांच्या गृहप्रकल्पांना मुद्रांक, एफएसआयमध्ये सवलत
राज्य सरकारने सुमारे १८ वर्षांनंतर महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण धोरण- २०२५ जाहीर केले. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबईत मराठी माणसासाठी आरक्षणाचे आश्वासन दिले होते. ते पाळले गेले नाही. मात्र, या धोरणानुसार विद्यार्थी, ज्येष्ठांच्या गृहप्रकल्पांना मुद्रांक शुल्क तसेच एफएसआयमध्ये (चटई क्षेत्र निर्देशांक) सवलत दिली जाणार आहे.