Kurmi community : झारखंडमध्ये कुडमी समुदायाचे आंदोलन; 40 स्थानकांवर गाड्या थांबवल्या; STमध्ये समावेशाची मागणी
झारखंडमध्ये कुडमी समुदायाने शनिवारी निदर्शने केली. अनुसूचित जमाती (एसटी) श्रेणीत समावेश करण्याच्या मागणीसाठी रेल टेका आंदोलन केले.राज्यातील ४० रेल्वे स्थानकांवर निदर्शने सुरूच होती. पारंपारिक पोशाख परिधान करून आणि ढोल-ताशांसह निदर्शक सकाळपासूनच रेल्वे रुळांवर उतरले.