ST Corporation, : कुर्नूल बस दुर्घटनेनंतर एसटी महामंडळ सतर्क; ‘स्लीपर बस प्रवासी सुरक्षा’ अभियान सुरू, प्रवाशांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी
आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी स्लीपर बसला लागलेल्या आगीत २० प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन प्रसंगी योग्य प्रतिसाद देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने म्हणजे एसटी महामंडळाने “शयनयान वाहन प्रवासी सुरक्षा मार्गदर्शन” अभियान सुरू केले आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.