Sri Lankan : श्रीलंकन नौदलाच्या गोळीबारात 5 भारतीय मच्छिमार जखमी; भारताने उच्चायुक्तांना बोलावले
श्रीलंकेच्या नौदलाने मंगळवारी सकाळी 13 भारतीय मच्छिमारांवर गोळीबार केला. यामध्ये 5 मच्छिमार जखमी झाले. हे सर्वजण डेल्फ्ट आयलंडजवळ मासेमारीसाठी गेले होते. ही बेटे श्रीलंकेच्या ताब्यात आहेत. या मच्छिमारांवर श्रीलंकेतील जाफना टीचिंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.