Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा- हवेत गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसली; स्थानिकच्या निवडणुकांतही ‘माती’ होण्याचे भाकीत
विरोधक हे सातत्याने आरोप करतात, पण कोर्ट जेव्हा त्यांना पुरावे मागते, तेव्हा ते देत नाहीत. निवडणूक आयोग देखील त्यांना पुरावे मागतो, पण एक पुराव देखील विरोधक देऊ शकत नाहीत. हवेत गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसलेली आहे, मात्र अजुनही ते सुधरले नाहीत. महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्यांची अशाच प्रकारची माती होणार असल्याचे भाकित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.