Priyanka Chaturvedi : ऑपरेशन सिंदूर यशस्वी मोहीम- ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदींकडून कौतुक
शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, ऑपरेशन सिंदूर हे एक यशस्वी मोहीम होती. यात दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. राजनाथ सिंह हे एक आदरणीय संरक्षण मंत्री आहेत. ते देशाला काय घडले याची माहिती देऊ शकले असते. प्रत्येक प्रश्न विरोधी पक्षाकडून येत नसतो. काही प्रश्नांची उत्तरे देणे ही त्यांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. देशातील जनतेच्या मनातील प्रश्न विरोधी पक्षाने उपस्थित केले आहेत. याचे मी स्वागत करते. सत्ताधारी पक्ष त्यांचे उत्तर देईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज चर्चा होईल, मला आशा आहे की पंतप्रधान दोन्ही सभागृहांना उपस्थित राहतील, असेही त्या म्हणाल्या.