Samajwadi Party : मुंबई महापालिकेसाठी समाजवादी पार्टीची पहिली यादी जाहीर; सर्व जागा लढवण्याचा निर्धार
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 ही मतदानाची तारीख जाहीर होताच राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तसेच निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी देखील काही पक्षांनी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. समाजवादी पक्षाने मुंबई महानगरपालिकेसाठी पहिली यादी जाहीर केली आहे.