Nitesh Rane : नितेश राणेंकडून उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; सिंधुदुर्गात भाजपची ताकद वाढली; पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेपर्यंत भाजपची सरशी
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडालेला असतानाच कणकवली पंचायत समितीतील एका घडामोडीने राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं आहे. पंचायत समिती निवडणुकीत कणकवली तालुक्यातील वरवडे मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सोनू सावंत हे बिनविरोध निवडून आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.