Sonu Nigam : गायक सोनू निगम विरोधात FIR दाखल; कन्नड लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप
कन्नड समुदायाच्या भावना दुखावल्याबद्दल गायक सोनू निगम यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बंगळुरूमधील अवलाहल्ली पोलिस स्टेशनमध्ये गायकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका संगीत कार्यक्रमादरम्यान कन्नड लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सोनूने व्हिडिओ बनवून आपली प्रतिक्रिया दिली आहे.