Sonia opinion : सोनियांचे मत- शिक्षण धोरणात 3C अजेंडा; सरकार मुलांच्या शिक्षणाबाबत उदासीन; फडणवीसांनी दिले उत्तर
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० वर टीका केली आहे. ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्रातील एका लेखात सोनिया गांधी यांनी लिहिले आहे की, ‘केंद्र सरकार शिक्षण धोरणाद्वारे आपला ३सी अजेंडा (केंद्रीकरण, व्यापारीकरण आणि सांप्रदायिकता) राबवत आहे. शिक्षण धोरण हे भारतातील तरुणांच्या आणि मुलांच्या शिक्षणाप्रति सरकारची खोल उदासीनता दर्शवते.