Sonia Gandhi : सोनिया गांधींविरुद्ध बिहारमध्ये खटला दाखल!
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘Poor Lady’ असे संबोधल्याबद्दल बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सीजीएम कोर्टात सुधीर ओझा नावाच्या वकिलाने ही तक्रार दाखल केली. न्यायालयाने ते मान्य केले.