Sonia and Rahul Gandhi : सोनिया अन् राहुल गांधींनी गुन्ह्यातून १४२ कोटी रुपये कमावले – EDचा न्यायालयात दावा!
नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी १४२ कोटी रुपयांच्या गुन्हेगारी रकमेचा फायदा घेतल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी राऊस अव्हेन्यू कोर्टात केला. या प्रकरणात न्यायालयाने सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि इतरांना नोटीस बजावली आहे.