सोनम वांगचूकचे उपोषण मागे; CJP चे आंदोलन सुरूच, पण आज सरकारशी करणार सविस्तर चर्चा!!
NEET Exam Paper Leak च्या दोषींविरुद्ध आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जवळपास 26 दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री 1.30 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय जाहीर केला. उपोषण थांबवण्याची माहिती सोनम वांगचुक यांनी एक्सवर पोस्ट करत दिली.