महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशींनी जन्म प्रमाणपत्रांसाठी अर्ज केले आहेत
२०२४ मध्ये महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १.५० लाखांहून अधिक बांगलादेशींनी भारतीय नागरिकत्वाची बनावट कागदपत्रे मिळवली आहेत, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी केला. या अनियमिततेची सखोल चौकशी करून त्यात सहभागी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.