CM Fadnavis : आगामी वर्षात उद्योगांना 3% स्वस्त वीज देणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही, एक महिन्यात 45,911 सौर कृषिपंप बसवले, गिनीज बुकमध्ये नोंद
देशात महाराष्ट्र राज्य सौरऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठीचे फीडर सौरऊर्जेवर आणून स्वतंत्रपणे १६ हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्याची योजना आहे. ती पूर्ण झाल्यावर म्हणजे पुढील वर्षात उद्योगांसह अन्य वापराच्या वीज दरात दरवर्षी ३ टक्के स्वस्त वीज देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले.