Devendra Fadnavis : सीएम फडणवीसांचा पलटवार- एवढे गोंधळलेले विरोधक मी कधीच पाहिले नाहीत, कोणत्या मुद्यावर कुठे जायचे हेच त्यांना माहिती नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या भेटीवर निशाणा साधला. एवढे गोंधळलेले विरोधक मी केव्हाच पाहिले नाहीत. कोणत्या मुद्यावर कुठे जावे हे ही या लोकांना माहिती नाही, असे ते विरोधकांची खिल्ली उडवताना म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारने पाऊस आणल्याची टीका करणाऱ्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचाही समाचार घेतला.