Sharad Pawar : शरद पवारांचे आवाहन- प्रागतिक विचारांच्या लोकांनो एकत्र या!; महाराष्ट्राचे समाजकारण योग्य मार्गावर आणण्याची गरज
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी महाराष्ट्राचे समाजकारण योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रागतिक विचारांच्या लोकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे राज्य आहे असे आपण म्हणतो, पण आज ज्यांच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे आहेत त्यांना फुले, शाहू, आंबेडकरांविषयी किती आस्था आहे याबद्दलची शंका वाटावी असे चित्र आहे, असे ते म्हणालेत.