CM Fadnavis : अहिल्यानगरात रांगोळीवरून तणाव; सीएम फडणवीस म्हणाले- सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर शासन करणार
राज्याचे सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर येथील धार्मिक मुद्यावरून निर्माण झालेल्या तणावाववर भाष्य करताना म्हटले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अहिल्यानगर प्रकरणात कडक कारवाई होणार हे स्पष्ट झाले आहे.