Sharad Pawar : सामाजिक वीण दुबळी होता कामा नये, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता; सरकारला रास्त तोडगा काढण्याचा दिला सल्ला
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात आरक्षणाच्या मुद्यावर सुरू असलेल्या आंदोलनांमुळे सामाजिक वीण दुबळी होत असल्यावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी या प्रकरणी राज्य सरकारला रास्त तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे. आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जात आहे. आज आनंदाचा दिवस आहे. पण दुर्दैवाने तसे चित्र दिसत नाही. सध्या दोन समाजात कारण नसताना वातावरण ढवळून निघत आहे. त्यामुळे सरकारने सर्वांमध्ये एकवाक्यता कशी येईल हे पाहिले पाहिजे, असे ते म्हणालेत.