Ajit Pawar : चिंतन शिबिरात बोलताना अजित पवार म्हणाले- समाजातील तेढ महाराष्ट्राला परवडणारी नाही, कोणावरही अन्याय होऊ द्यायचा नाही
नागपूर येथे चिंतन शिबिरात बोलताना अजित पवार म्हणाले, राज्याचे हित डोळ्यासमोर ठेऊन काम करताना कोणावर अन्याय होऊ देणार नाही. सारथी बार्टी सगळ्या संस्थांना मदत केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. मागील दोन महिन्यापासून समाजा समाजात तेढ निर्माण केली जातेय, ही पुरोगामी महाराष्ट्राला परवडणारी नाही, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.