Prakash Mahajan : तुमच्या डोक्यावर कोणी नाही म्हणून बेलगाम; राज ठाकरेंच्या आरोपांवर प्रकाश महाजनांचा घणाघात; उद्धव ठाकरेंवरही निशाणा
मुंबई विमानतळ बंद करण्यात येऊन ती जागा हडपण्याचा डाव असल्याची शंका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थित केली होती. राज ठाकरेंनी केलेल्या या आरोपावर आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पलटवार केला आहे. मुंबईतील सांताक्रुज विमानतळ बंद झाले, ते काय विकले का सरकारने? असा सवाल महाजन यांनी राज ठाकरेंना उद्देशून विचारला आहे.