Tamil Nadu : तामिळनाडूत दोन बसची समोरासमोर धडक, 11 ठार, मृतांमध्ये 2 मुलांचा समावेश; 20 हून अधिक जखमी
तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील तिरुपत्तूरजवळ रविवारी दुपारी दोन बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 8 महिला, 2 मुले आणि एका पुरुषाचा समावेश आहे. 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. शिवगंगा एसपी शिवा प्रसाद यांच्या मते, काही जखमींची प्रकृती गंभीर आहे.