Phaltan Doctor Suicide : फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन; महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात होणार तपास, निष्पक्ष चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांचा निर्णय
फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकामार्फत करण्यात येणार आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन, राज्याचे पोलिस महासंचालक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार, हा संपूर्ण तपास एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाकडून केला जाईल, जेणेकरून प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी.