• Download App
    SIT chief taunt Sushma Andhare 2026 | The Focus India

    SIT chief taunt Sushma Andhare 2026

    Sushma Andhare : खरात प्रकरणात एसआयटीपेक्षा दमानियांचा तपास भारी; त्यांनाच प्रमुख करा, सुषमा अंधारेंचा टोला

    भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत चालले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जाहीर केलेल्या कॉल रेकॉर्ड्सवरून (CDR) आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “एका खासगी व्यक्तीला गोपनीय कॉल रेकॉर्ड्स कसे मिळू शकतात? हा ‘ब्रीच ऑफ प्रायव्हसी’चा (गोपनीयतेचा भंग) गंभीर प्रकार असून, दमानियांचीच चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. तसेच एसआयटीपेक्षा दमानियांचा तपास भारी आहे, त्यांनाच प्रमुख करा” असा टोला लगावला.

    Read more