Sisodia : सिसोदिया आणि जैन यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी होणार; गृह मंत्रालयाचा आदेश
गृह मंत्रालयाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि मंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध चौकशीला मान्यता दिली आहे. मंत्रालयाने गुरुवारी उपराज्यपालांच्या सचिवालयाला कळवले की, भ्रष्टाचार प्रकरणात दोघांविरुद्ध चौकशीला मंजुरी देण्यात आली आहे.