Siren system : भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये वाढली भीती, ‘या’ शहरांमध्ये बसवले सायरन सिस्टीम
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करत आहे. भारताच्या या कृतीमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण सतत वाढत आहे. या भीतीमुळे, खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारने राज्यातील किमान २९ जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन सायरन बसवण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे, भारताकडून होणाऱ्या कोणत्याही हवाई हल्ल्यादरम्यान, सायरन वाजवून लोकांना सतर्क केले जाईल.