Taliban :अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार कोसळण्याचा धोका; ऑडिओ लीकमुळे अंतर्गत संघर्ष उघड; सर्वोच्च नेते आणि गृहमंत्र्यांचे गट भिडले
अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या आत परिस्थिती ठीक नाही. परिस्थिती इतकी बिघडली आहे की सरकार कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. संघटनेच्या आत सत्तेवरून सुरू असलेली ओढाताण आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. बीबीसीच्या अहवालानुसार, अलीकडेच एका व्हायरल ऑडिओ क्लिपमधून याचा खुलासा झाला. मात्र, याची निश्चित तारीख समोर आलेली नाही.