Mamdani Photo : ममदानींनी इमामसोबत फोटो काढल्याने ट्रम्प संतापले; म्हणाले- अनर्थ होतोय, वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवणाऱ्या व्यक्तीशी मैत्री निभावताय
न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाचे उमेदवार जोहरान ममदानी यांच्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका इस्लामिक कट्टरपंथी व्यक्तीच्या जवळ असल्याचा आरोप केला आहे. खरं तर, ममदानी १८ ऑक्टोबर रोजी ब्रुकलिन इमाम सिराज वहाजसोबत हसत हसत फोटो काढताना दिसले, ज्यांच्यावर १९९३ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर बॉम्बस्फोटाचा कट रचण्याचा आणि मुस्लिमांना जिहादसाठी भडकवण्याचा आरोप आहे.