Parliament : लोकसभेत वंदे मातरमवर होऊ शकते 10 तास चर्चा; केंद्र एसआयआरवर चर्चेस तयार, पण वेळेची मर्यादा नसावी
संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारी सुरू झाले. एसआयआरच्या मुद्द्यावरून आणि मतचोरीच्या आरोपांवरून दोन्ही सभागृहात गोंधळ झाला. विरोधी पक्ष चर्चेवर ठाम आहे. दरम्यान, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेला माहिती दिली की, सरकार एसआयआर आणि निवडणूक सुधारणांवर चर्चा करण्यास तयार आहे. त्यांनी विरोधकांना या विषयावर कोणतीही कालमर्यादा लादू नये असे आवाहन केले.