Single Window App : कृषी क्षेत्रासाठी एआय आधारित तंत्रज्ञानासह ‘सिंगल विंडो ॲप’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे पीकविमा योजना आणि ई-पीक पाहणीच्या बैठकीत कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुदधीमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी एकत्रित सेवा ॲप (सिंगल विंडो ॲप) आणि संकेतस्थळ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला.