CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- धर्मांतर करून मिळविलेले अनुसूचित जातींचे प्रमाणपत्र रद्द होणार; जबरदस्तीने धर्मांतर होऊ नये याची तरतूद करू
अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ केवळ हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मीयांनाच मिळू शकतो. अन्य धर्मीय त्यासाठी पात्र नाहीत, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने २६ नोव्हेंबर २०२४ रोजी दिला आहे. या अनुषंगाने धर्मांतर करून घेतलेले अनुसूचित जातींचे प्रमाणपत्र रद्द होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. तसेच कोणाचेही जबरदस्तीने धर्मांतर करता येणार नाही याची तरतूद करू, असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिले.