Rahul Gandhi : राहुल गांधींवर वाराणसी कोर्टात खटला चालणार; अमेरिकेत म्हटले होते- शिखांना भारतात पगडी-कडा घालण्याचा अधिकार आहे?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. आता शिखांविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल वाराणसी न्यायालयात त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला जाणार आहे. गेल्या वर्षी अमेरिका दौऱ्यावर असताना राहुल गांधी म्हणाले होते की, “भारतात शिखाला पगडी आणि कडा घालण्याचा अधिकार आहे का, यावर हा लढा आहे.”