Rohit Pawar : मंत्री शिरसाटांच्या अडचणीत भर; 12 हजार पानांचे सुटकेस भरून पुरावे रोहित पवारांकडून सादर
सिडकोतील तब्बल ५ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “पुरावे द्या” असे खुले आव्हान दिले होते. हे आव्हान स्वीकारत रोहित पवार सोमवारी पत्रकार परिषदेत तब्बल १२ हजार पानांचे दस्तऐवज घेऊन मैदानात उतरले. या पुराव्यांच्या बॅगमुळे शिरसाट यांच्यावरील संकट अधिक गडद झाले आहे.