Yasin Malik : जम्मू – काश्मीरमध्ये SIAचे 8 ठिकाणी छापे; यासीन मलिकच्या घराची झाडाझडती
जम्मू आणि काश्मीरच्या राज्य तपास यंत्रणेने (SIA) मंगळवारी श्रीनगरमधील 8 ठिकाणी छापे टाकले. एप्रिल 1990 मध्ये खोऱ्यात दहशतवाद शिखरावर असताना काश्मिरी पंडित महिला सरला भट्ट यांच्या अपहरण आणि हत्येशी संबंधित हा खटला आहे.