अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र; सैन्यातील 3 अधिकाऱ्यांना कीर्ती चक्र, 13 जणांना शौर्य चक्र
प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी रविवारी केंद्र सरकारने शौर्य पुरस्कार आणि सेवा पदकांची घोषणा केली. अंतराळवीर आणि हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्राने सन्मानित केले जाईल. तर तीन अधिकाऱ्यांना किर्ती चक्र आणि 13 जणांना शौर्य चक्र दिले जाईल.