Shubanshu Shukla : शुभांशू शुक्ला अवकाशात पोहोचणारे ६३४ वे अंतराळवीर बनले
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला अवकाशात जाणारे ६३४ वे अंतराळवीर बनले आहेत. २८ तासांच्या प्रवासानंतर ते गुरुवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) दाखल झाले. शुक्ला आणि इतर तीन अंतराळवीरांचे अंतराळ स्थानकावर एक्सपिडिशन ७३ च्या सदस्यांनी मिठी मारून आणि हस्तांदोलन करून औपचारिक स्वागत केले.