Shri Siddhivinayak Temple : श्री सिद्धिविनायक मंदिरात आता नारळ, हार अन् प्रसाद बंदी
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या व्यवस्थापनाने शुक्रवारी सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव ११ मे पासून मंदिरात नारळ, हार आणि प्रसाद अर्पण करण्यास परवानगी दिली जाणार नाही. दक्षिण मुंबईतील प्रभादेवी परिसरात असलेले हे मंदिर एक लोकप्रिय धार्मिक स्थळ आहे जे मोठ्या संख्येने भाविकांना आकर्षित करते. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर म्हणाले की, मंदिराला दररोज हजारो लोक भेट देतात आणि ते दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर आहेत.