Shri Kedarnath :पहिल्याच दिवशी ३० हजारांहून अधिक भाविकांनी घेतले श्री केदारनाथाचे दर्शन
श्री केदारनाथ धामचे दरवाजे २ मे रोजी विधिवत विधींसह भाविकांसाठी उघडण्यात आले. दरवाजे उघडल्यानंतर पहिल्याच दिवशी (शुक्रवारी) भाविकांमध्ये दर्शनासाठी प्रचंड उत्साह होता. पहिल्या दिवशी, विक्रमी ३०,१५४ यात्रेकरूंनी बाबा केदारनाथांचे दर्शन घेतले.