Nitish Kumar : नितीश मंत्रिमंडळात 10 नवे मंत्री, एक मुस्लिम चेहरा; तेज प्रताप यांना पराभूत करणाऱ्या संजय सिंहांना संधी
नितीश कुमार हे १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांनी गुरुवारी पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत २६ मंत्र्यांनीही शपथ घेतली. नितीश यांच्या मंत्रिमंडळात जमुईमधून विजयी झालेल्या श्रेयसी सिंहसह दहा नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.